Ahmednagar News: अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन येथील आठरे हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड करत कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्या गणेश सर्जेराव फसले यांच्यासह आलेल्या 30 ते 40 जणांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी डॉ. अनिल आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
गणेश फसले व त्यांच्यासोबत असलेल्या 30 ते 40 जणांनी हॉस्पिटल मध्ये जबरदस्ती प्रवेश करून प्रवेश हॉस्पिटलमधील आय. सी. यू,ऑपरेशन थिएटर, अंतररुग्ण विभाग, लॅबरोटरी, संगणक कक्ष व इतर भागातील कुलपे तोडून कॉट्स, मॉनिटर्स, एसी युनिट, वेंटीलेटर, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस केली व त्याबरोबरच तोडफोड करून डॉ. अनिल आठरे पाटील यांच्या कुटुंबावर हल्ला केला आणि अब्रुनुकसानिकारक कृत्य केले.
गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांकडून वारंवार होणा-या हिंसक कृत्यांद्वारे माझ्या परिवाराला आणि हॉस्पिटलच्या स्टाफला अत्यंत धोका होत आहे. त्याचे हे कृत्य असेच चालू राहिले तर माझ्या परिवाराच्या जीवीतास धोका आहे. संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांवर योग्य ती कडक कारवाई करावी, व माझ्या परिवाराला व आठरे पाटील मेमोरीयल हॉस्पिटल स्टाफच्या सुरक्षिततेसाठी योग्य तो न्याय दयावा अशी मागणी डॉ. आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली.