Ahmednagar News: 28 डिसेंबर 2023 रोजी कोळगाव शिवारातुन सुमारे 1200 किलो शेतकऱ्याने अंगणात जमा करून ठेवलेली तुर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचा गुन्हा ऋषिकेश देविदार लगड यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये भादवि.क.379, 342 प्रमाणे गुन्हा दाखल होता.
त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी तपास पथक नेमुन जिल्हयात पथके रवाना केले. त्यावेळी पो.नि.स्थागुशा दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, सदरची चोरी ही जामगाव येथील संदिप उत्तम गोरे व त्याचे सोबत असलेल्या लोकांनी चारचाकी वाहनाचे साहाय्याने केली आहे.
या माहितीवरून त्यांनी पारनेर तालुक्यातील जामगाव येथे स्थागुशा यांनी सापळा रचुन संदिप उत्तम गोरे , वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी, अमोल संतोष माळी, रोहीत सुनिल शेळके, आकाश आजिनाथ गोलवड, विकास विठ्ठल घावटे यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.
त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला शेतमाल 1200 किलो तुर रुपये 96,000 किमतीची जप्त करण्यात आलेली आहे. तसेच तुर वाहतुक करण्यासाठी वापरलेला 8,00,000 रुपये किमतीची टाटा इंट्रा व्ही व नगर तालुक्यातील चोरुन नेलेले सोयाबीन 06 क्विंटल सोयाबिन 30,000 रुपये कि.चे असा एकुण 9,26,000 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
स्थागुशा अहमदनगर यांनी आरोपी व मुद्देमाल बेलवंडी पोस्टेस पंचनामा करुन ताब्यात देण्यात आले. आरोपींना बेलवंडी पोस्टेचे गुन्हयात अटक केले व पुढील तपास करिता समन्वय साधून बेलवंडी पोस्टेचे पो.नि.ठेंगे व पोलीस उपनिरीक्षक गाजरे, चाटे, पोहेकाँ खेडकर, पो.हे.कॉ. नंदकुमार पठारे, पोना शेख, पोकाँ पवार, भांडवलकर, दिवटे, शिपनकर, शिंदे यांनी आरोपींकडे अटक मुदतीत अधिक तपास करुन नगर तालुक्यातील शेंडी एम आय डी सी पोलीस स्टेशन येथिल दाखल असलेला गुन्हा रजि.1032/2023 भादवि.क.379 प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला असुन आरोपीकडुन 08 सोयाबिनचे अर्धवट भरलेले कट्टे जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकाँ खेडकर हे करीत आहेत.