DNA मराठी

Ahmednagar News: व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाची बदनामी, गुन्हा दाखल

Ahmednagar News:  मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण   मिळावा या मागणी करिता आमरण उपोषण सुरू केला आहे.

या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाकडून 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला अहमदनगर शहरात देखील प्रतिसाद मिळाला.

तर दुसरीकडे शेंडी गावातील सरपंच प्रयागा प्रकाश लोंढे यांना गावातील काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना कचरा टाकण्याकरीता खड्डा करण्याच्या वादातून घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र या घटनेला जातीय रंग देऊन लोंढे यांना झालेली मारहाण ही मराठा ओबीसी वादातून झाली असल्याची पोस्ट एका  व्यक्तीने सोशल मीडियावर टाकली.  

आता या प्रकरणात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये रामदास जरांगे यांच्या फिर्यादीवरून कलम 501 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *