Dnamarathi.com

Ahmednagar News:  अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड या ठिकाणी घडलेल्या बहुचर्चित असलेल्या ओंकार (गामा)भागानगरे हत्याकांडातील आरोपींना सिव्हिल प्रशासन व जेल प्रशासन सहकार्य करत असल्याचा आरोप मृत ओंकार (गामा)भागानगरे यांचे बंधू तुषार भागानगरे यांनी केला आहे.

 सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरोपी हुच्चे हा आजारी असल्याचे नाटक करत असून त्यानंतर त्याचे अवैध धंदे चालवत असल्याचा आरोप केला असून या संदर्भातील निवेदन जिल्हाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, नाशिक परिक्षेत्राचे बीजी शेखर यांना तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील तक्रार केली असून मागणी केली आहे की आरोपींना कठोर कठोर कारवाई व्हावी.

 यापूर्वी देखील सबजेल  कारागृहामध्ये खोटे आधार कार्ड दाखवून आरोपी हुच्चे यास अमोल येवले नावाचा एक ईसम भेटायला जात होता ते देखील आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले .

 मदत करत असल्याने आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी भागानगरे कुटुंबीयांकडून करण्यात आली.

त्याला सबजेल कारागृहातून हलवून इतर जिल्ह्यातील कारागृहामध्ये टाकावं अशी मागणी करण्यात आली. जर ही मागणी मान्य नाही झाली तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *