DNA मराठी

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा; भाजप – राष्ट्रवादी युती तर शिवसेना स्वबळावर

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून राष्ट्रवादी शरद पवार गट 32, शिवसेना ठाकरे गट 24 आणि काँग्रेस 12 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तिन्ही पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी म्हणून लढणार असून ज्या ठिकाणी डबल एबी फॉर्म दिले गेले ते विथड्रवाल करणार येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये युतीची घोषणा झाली असून भाजप 32 तर राष्ट्रवादी काँग्रेस 34 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महायुतीमधून बाहेर होण्याची घोषणा केली आहे. शिवसेना शिंदे गटाला समाधानकारक जागा न मिळाल्याने शिवसेना शिंदे गट स्वबळावर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे आता अहिल्यानगर महापालिकेसाठी महायुती विरुद्ध महाविकास विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीसाठी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये युतीसाठी चर्चा सुरू होती मात्र जागावाटपावरून मतभेद झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

तर दुसरीकडे एमआयएम आणि मनसे देखील अहिल्यानगर महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आता अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *