Abhijeet Bichukale : राज्यात आज 200 पेक्षा जास्त नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी मतदान सुरू असून निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यापूर्वी 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार होते मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर 21 डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता सातारा नगरपालिकेचे अपक्ष उमेदवार बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या 21 तारखेच्या मतमोजणीवर जहाल प्रतिक्रिया व्यक्त केली.
आज मतदान झाल्यानंतर निकाल हा 20 दिवसानंतर आहे माझं सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकांना प्रत्यक्ष उभा राहिलेल्या सगळ्या अपक्ष पक्षीय उमेदवारांना विनंती आहे निकालाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवल्या जातात त्या ठिकाणी अंथरून पांघरून घेऊन मुक्कामाला जावा भाजप काहीही करू शकतं असं शरद पवारांनी सांगितलं होतं ते खरं ठरू शकत म्हणून ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेला आहे तिथेच मुक्कामी जावा गडबड होण्याची शक्यता आहे मी सेलिब्रेटी म्हणून सांगतोय असं माध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले.
मतदानाच्या काही तासांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत राज्यातील 24 नगरपरिषदेच्या निवडणुका रद्द करून पुढे ढकलले होते मात्र 03 डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाचा परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता असल्याने आज उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत राज्य निवडणूक आयोगाला 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहे.






