Dnamarathi.com

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंबाचा कणा असुन तिच्या अस्तित्वावर कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे तिने कोणत्याही परिस्थितीत धैर्याने उभे राहणे गरजेचे आहे. 

आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत असून आपल्या कुटुंबाची जबाबदारी देखील तितक्याच काळजीने पार पडत आहे.

 महिलांच्या अतुलनीय योगदानामुळे समाजाची व राष्ट्राची चौफेर प्रगती होईल असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले असून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या लाडजळगाव येथील उत्कर्ष फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष ज्ञानेश्वर तहकिक, अमोल तहकिक, चंद्रकांत खरात, भाऊसाहेब क्षीरसागर, जगदीश जंगम यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

प्राध्यापिका संजीवनी नवल यांचे व्याख्यानाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून शोभा तहकिक, मोनिका छाजेड, मनीषा कळसाई, मयुरी परदेशी, अस्मिता मराठे, पूजा मुळे, रेखा परदेशी, सुमनबाई कुलकर्णी, कांताबाई राठोड, रुख्मिणी कुलकर्णी आदींसह  महिलांचा सन्मान करण्यात आला होता. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *