Dnamarathi.com

Assembly Election 2024 : ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रासह  हरियाणामध्ये देखील विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे मात्र पूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

 लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीला तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या काँग्रेस आमदार किरण चौधरी आणि त्यांची कन्या माजी खासदार श्रुती चौधरी यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या सर्व समर्थकांना दिल्ली गाठण्याच्या सूचना दिल्या आहेत.

किरण चौधरी मुलगी श्रुती चौधरी यांना भिवानी-महेंद्रगड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून तिकीट मागत होत्या, पण पक्षाने त्यांच्या जागी महेंद्रगडमधून काँग्रेसचे आमदार राव दान सिंह यांना तिकीट दिले, त्यामुळे किरण चौधरी नाराज झाले होत्या. त्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

 बुधवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री नायबसिंग सैनी आणि केंद्रीय मंत्री मनोहर लाल देखील उपस्थित राहू शकतात.

काँग्रेस अध्यक्षांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात किरण चौधरी म्हणाल्या, “मी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मी चार दशकांपासून काँग्रेसचा एकनिष्ठ सदस्य आहे. मी माझे जीवन पक्ष आणि लोकांसाठी समर्पित केले आहे. हरियाणात, मी दिवंगत बन्सीलाल लाल आणि आधुनिक हरियाणाचे शिल्पकार दिवंगत पती सुरेंद्र सिंग यांच्या वारशाचे देखील प्रतिनिधित्व करते. मात्र, माझ्यासारख्या प्रामाणिक आवाजाला जागा न देता हरियाणात काँग्रेस पक्षाचा कारभार अतिशय नियोजनबद्ध आणि पद्धतशीरपणे दडपून टाकला जात आहे. “

अपमान सहन करण्याची मर्यादा असते- श्रुती चौधरी

आपल्या राजीनामा पत्रात श्रुती चौधरी यांनी लिहिले की, “हरयाणातील काँग्रेस पक्ष दुर्दैवाने व्यक्तीकेंद्रित झाला आहे ज्याने स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाच्या हिताशी तडजोड केली आहे. त्यामुळे आता माझ्यासाठी पुढे जाण्याची वेळ आली आहे जेणेकरून मी माझ्या लोकांचे हित आणि मी ज्या मूल्यांसाठी उभी आहे ते जपता येईल. अपमान सहन करण्याची मर्यादा असते.

यावेळच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने हरियाणामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि यावेळी सलग दोनवेळा दहा जागा जिंकणाऱ्या भाजपची बरोबरी केली होती, परंतु विधानसभेच्या आधी निवडणुकीच्या निमित्ताने आता पक्षांतर्गत वाद सूरु झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *