Ahilyanagar BJP: भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहील्यानगर शहरात लोकतंत्र बचाव भीडतंत्र हटाव मोर्चाचे आयोजन १६ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ५ वाजता करण्यात आले असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.काॅग्रेस पक्षाने देशात निर्माण केलेल्या फेक नॅरेटिव्हला रस्त्यावर उतरून चोख उतर दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोर्चाच्या आयोजनासाठी आयोजित केलेल्या पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या बैठकीस सभापती राम शिंदे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराचे अध्यक्ष अनिल मोहिते, बाबासाहेब वाकळे, निखिल वारे, विनायक देशमुख, प्रा.विश्वनाथ कोरडे यांच्यासह सर्व मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी देशात काॅग्रसने अराजक निर्माण केले आहे.काॅग्रसचे नेते राहूल गांधी हातात संविधान घेतात मात्र संविधान मानायला तयार नाहीत.कोणत्याही प्रश्नाची चर्चा संसदेत करण्याची मानसिकता त्यांची नाही.कारण संसदेत खर बोलावे लागते.यासाठी फक्त फेक नॅरेटिव्ह पसरवून देशात गोंधळ घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
केवळ जनतेत बुध्दीभेद करून तीन निवडणुका हरल्यानंतर सुध्दा काॅग्रेसेच्या नेतृत्वाला जाग येत नाही.काही राज्यात यश मिळाले तर एव्हीएम चांगले.मात्र इतर वेळेस निवडणुक आयोग आणि एसआरआयच्या विरोधात खोटे बोलायचे हा काॅग्रेसचा दुटप्पीपणा लपून राहीलेला नाही.
सीजेपीला पुढे करून काॅग्रेस आपली राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप करून,सोनिया गांधीचे आत्मचरित्र म्हणजे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे.आणीबाणीच्या घटनेला पन्नास वर्ष झाल्यानंतर तुम्हाला बोलावेसे वाटले.लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू केले असल्याची टिका मंत्री विखे पाटील यांनी केली.
सभापती राम शिंदे यांनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारचे काम अतिशय चांगल्या पध्दतीने सुरू आहे.पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वाखाली सलग बारा वर्षाच्या कारकिर्दीत एकही भ्रष्टाचाराचा आरोप होवू शकला नाही.देशातील जनतेला अभिमान आणि स्वाभिमान वाटेल असे काम सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार आशा आफवा पसरवून दिशाभूल केली.संसदेत कोणत्याही प्रकारची चर्चा करण्याची मानसिकता या पक्षाच्या नेत्यांची नाही.त्यामुळे आता त्यांच्या रस्त्यावरच्या लढाईला तेवढ्याच ताकतीने उतर देण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यानी उतरावे, अहील्यानगरचा मोर्चा राज्यात लक्षवेधी ठरेल असे नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा बँकेचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.मिळालेले पद हे सर्व नेते मंडळीचे आणि कार्यकर्त्याच्या योगदानाचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.प्रास्ताविक अध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले.






