Ashok Kharat : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाला आजबरोबर सहा महिने पूर्ण होत आहे.पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूगिरीचे भयावह वास्तव अंनिसमुळे समोर आले आहे.या सहा महिन्यात पोलिसांनी राज्यात शंभरहून अधिक भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यात बहुतांशी प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे.पुरोगामी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणातभोंदूंचे पेव फुटले बाबत राज्यभर चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी व विचार करायला लावणारी ही गंभीर बाब आहे.
भोंदू खरात प्रकरणानंतर महा.अंनिसने राज्यभर बुवाबाजी संघर्ष परिषदांचे आयोजन केले होते. त्यामुळे शोषक भोंदूगिरी विरोधात चर्चा होऊन पीडितांना पाठबळ मिळाले.काही ठिकाणी उत्स्फूर्त तर काही ठिकाणी अंनिसच्या प्रयत्नाने हे गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती महा.अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, अॕड रंजना पगार -गवांदे , कृष्णा चांदगुडे व विष्णुदास लोणारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या यादीवरून असे लक्षात येते की बहुतांश सर्वच धर्मातील भोंदू बाबा विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केवळ हिंदू धर्मातच केले जाते , या सनातनी आरोपाला पुन्हा एकदा सणसणीत उत्तर मिळाले आहे .भोंदू बाबांनी ग्रामीण भागासह व शहरी भागातील महिला व पुरुष यांची फसवणूक केल्याचे या घटनांवरून उघड झाले आहे.विशेषत: यात महिलांवरील शाररिक शोषणासह आर्थिक लुटीचे प्रमाण अधिक आहे . करणी भानामती काढतो, अंगात आलेले भूत उतरवतो, अघोरी पूजा करतो, कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणी, आजारपण यातून बाहेर काढतो, पैशांचा पाऊस पाडतो इत्यादी कारणांसाठी भोंदूने भक्तांची फसवणूक केली आहे.
भितीपोटी व सामाजिक प्रतिष्ठेपोटी अनेक पीडित समोर येण्यास घाबरत होते. खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे,त्यांना न्यायाची अपेक्षा निर्माण झाली आहे. त्यामुळे महा. अंनिस च्या मदतीने एवढे गुन्हे दाखल झाले आहेत.इतरही आणखी पीडितांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
अंधश्रद्धेमुळे समाजातील फसवणूक रोखण्यासाठी शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १८ वर्ष लढा दिला. या संघर्षा नंतर २०१३ मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३’ हा कायदा अस्तित्वात आला. असा कायदा बनविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते.या कायद्याची प्रभावी अंबलबजवणी करण्यात सरकार अयशस्वी ठरले असले तरी अंनिस मर्यादा व क्षमता याचा विचार करता,आपल्या पातळीवर त्याचे प्रबोधन, प्रचार, प्रसार करत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत . परंतु या कायद्याचे नियम अजून बनविले गेले नसल्याने गुन्हा नोंद करताना संभ्रम तयार होत आहे .त्यामुळे कायद्याचे नियम लवकर बनवावे व प्रत्येक पोलीस स्टेशनला या कायद्याच्या अंमलबजावणी कामी दक्षता अधिकाऱ्याची नेमणूक व्हावी असे आवाहन महा. अंनिसने केले आहे. हे गुन्हे जादूटोणा विरोधी कायदा व इतर कायद्याच्या कलमाखाली दाखल झालेले आहेत. ह्या दाखल झालेल्या 100 गुन्ह्यांचा तपशील पुढील प्रमाणे:
१) अशोक कुमार खरात , नाशिक
२)गडगेबाबा राजेंद्र गडगे, संगमनेर , अहिल्यानगर
३) चेतन सुनील माळी,मूर्तिजापूर, अकोला
४) पंकज देवराम घोलप, येडगांव, पुणे
५)मोहन मामा भोसले, कुर्डुवाडी,
सोलापूर
६)नाना बर्डे , आळे फाटा , पुणे
७) ऋषिकेश वैद्य ,वसई ,मुंबई
८) अल्ताफ रईस खान ,मालाड, मुंबई
९) रिधम पांचाळ, मालाड, मुंबई
१०) गणेश शिंदे ,श्रीरामपुर, अहिल्यानगर
११) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा , नवी मुंबई
१२)विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक
१३)किसन तळपे मंदोशी, खेड
१४ ) महेशगिरी उर्फ महेश काकडे,लासलगाव ,नाशिक
१५) अब्दुल रशीद शेख, खालापूर, रायगड
१६) इरफान नियाज अहमद , कांदिवली , मुंबई
१७) अनिल सोलोमन सिंग
( पादरी), पुणे
१८)शिवराम पराश सावर, पालघर
१९)अल्ताफ हसन मदारी, जळगाव
२०)नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर, टेंभुर्णी . सोलापूर
२१) पिंटू धुमाळ बारामती, पुणे
२२) हेमदास किसन बावणे,अड्याळ,भंडारा
२३) चंद्रकांत राजेंद्र माळी , इगतपुरी, नाशिक
२४) अशोक मधुकर आढाव, श्रीरामपूर,अहिल्यानगर
२५) औदुंबर गडदे, स्वारगेट, पुणे
२६)नवनाथ गवळी, खेड, पुणे
२७) शाहिद शेख, खडकपाडा,कल्याण
२८) शिव भाऊ सोनवणे, सर्जेपुरा, अहिल्यानगर
२९) ज्ञानेश्वर नागोराव कोरडे, बिलोली, नांदेड
३०) रमेश गुप्ता , मालाड , मुंबई
३१)हरिगिरी दत्तगिरी महाराज , भाग्यनगर, नांदेड
३२) मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित , ठाणे
३३) कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते,
पश्चिम देवपूर, धुळे
३४) यशवंत एकनाथ थोरात, पारनेर, अहिल्यानगर
३५) श्याम महाराज राठोड , दिघी , पुणे
३६) सुधाकर गाडगे, बाळापूर , अकोला
३७) परमेश्वर उर्फ प्रमोद बाळू गायकवाड, उत्तमनगर, पुणे
३८) शितल सालके व पोर्णिमा सारस्वत भारती विद्यापीठ, पुणे
३९) योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार
, निजामपूर, साक्री, धुळे
४०) विठ्ठल पवार, महागाव, यवतमाळ
४१) ताहीर रशीद बेग, सक्करदरा, नागपूर
४२) सुधाकर रमेश काळे, अंजनगाव सुर्जी, अमरावती
४३) अशोक रामधन राठोड, वडगाव (जंगल) , यवतमाळ
४४)महेश मोहन बाबर, विटा, सांगली
४५) कमलेश महाराज अधिकारी, इंदिरानगर, नाशिक
४६)परवेज अब्दुल अजीज मेमन , कोंढवा, पुणे
४७) गंगाधर बुरांडे, सावली, चंद्रपूर
४८) भीमराव पुंजाराम बिहाडे, संभाजीनगर
४९) मुक्तानंदगिरी महाराज उर्फ बापू महाराज,कन्नड, संभाजीनगर
५०) राजू बन्सी दिवटे, पारनेर, अहिल्यानगर.
५१) मौलाना अब्दुल हलिम शेख.
बारामती, पुणे
५२) मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी, सोलापूर
५३)मारोती चंदरराव मोरे,लातूर , ग्रामीण
५४) भगवान रामभाऊ पगार,सटाणा ,नाशिक
५५)अशोक संपत खरात, शिर्डी , अहिल्यानगर
५६) आय्याज ताज मदारे, नागपूर
५७) राधामोहन मिश्रा, खराडी, पुणे.
५८)रौफ इब्राहिम शेख , मालेगाव, नाशिक
५९) यौवन भानुदास गोहाड, सायखेडा, नाशिक
६०) फिरोज आदम शेख ,कपूरबावडी, ठाणे
६१) संजय शिरोडे , नागपूर
६२) संजय कवडेवार, लोहरा, यवतमाळ.
६३) किशोर धोंडिबा जाधव, लातूर
६४) मुजिम मौलाना, पातूर, अकोला
६५) सुनील मालेपेरमिल वर्गीस, बंड गार्डन,पुणे
६६) पास्टर केनेथ पॉल सिल्वे, कोंढवा, पुणे
६७) अनिल कुबल, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग
६८) स्वप्नील विकास निखाते, वरोरा, चंद्रपूर
६९)तेजस तानाजी कांबळे, करवीर , कोल्हापूर
७० ) तेलंगणा बाबा, पंचवटी, नाशिक.
७१) शशिकांत सीताराम भुजिंगे , मिरज, सांगली
७२)दत्तगिरी गुरु जयराम महाराज ,चांदुर रेल्वे, अमरावती
७३) श्रावण तुकाराम ढोंगे, मूल, चंद्रपूर
७४) डॉ मोहन पुरी, नाशिक
७५) अजय राणा ,अर्नाळा
७६) शाहिस्ता अंजुम मोहम्मद शकील शेख, चंद्रपूर
७७)अमोल दिगंबर गिरी , केज, बीड
७८) रघुदास रामदास चव्हाण, माढा, सोलापूर
७९) गोपाळ लांजेवार, लाखंदूर, भंडारा
८०) धोंडबा अरविंद वाघमारे, विरूर , चंद्रपूर.
८१) सागर जोशी, त्रंबकेश्वर , नाशिक ( गुन्हा ठिकाण- बीड)
८२) स्वप्नील लांडे, वडगाव मावळ, पुणे.
८३) मोहम्मद इस्माईल वारीस शेख, भिवंडी ,मुंबई
८४)कुंडलीक देवराव रूपनर, उदगीर, लातूर
८५)रविंद्र सिताराम भाजीवाले, नागभीड, चंद्रपूर
८६) दिव्या जितेंद्र परमार, कोंढवा, पुणे.
८७)विशाल रामदास खंडागळे , भद्रकाली, नाशिक
८८) देवेंद्र ओम नाथ, राहाता , अहिल्यानगर
८९) रामलाल लक्ष्मण कासदेकर, धारणी , अमरावती
९०)रामनरेश नथ्थू शिवकर्मा , कुही, नागपूर
९१) राईशमिया व अस्मा राईशमिया, नवी मुंबई.
९२)जालिमनाथ कालुनाथ, ओझर मिग, नाशिक.
९३) हिराचंद बर्डे, अभोणा, नाशिक
९४) मोनिका विधाते, बिबवेवाडी, पुणे
९५) देवगण विक्रम सहारे, बल्लारपूर, चंद्रपूर.
९६ ) अरुण रामभाऊ दोरके, यवत, पुणे
९७) सुरेश रमेश येदानी , खापरखेडा, नागपुर
९८) केतन नाना शिंदे, वालचंदनगर, पुणे.
९९) नाव माहीत नाही , चंदननगर , पुणे .
१००) अख्तर खान शामीन खान पठाण, वदोदबाजार, छत्रपती संभाजीनगर.






