DNA मराठी

Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात नवा खुलासा; त्याच हॉटेलमध्ये चेतनसोबत…

siya goyal

Siya Goyal : पुण्यातील गाजलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. आता तपासादरम्यान पोलिसांच्या हाती अशी माहिती लागली आहे की, मुख्य आरोपी सिया गोयलने केतनच्या मृत्यूनंतरही तिच्या प्रियकर चेतन चौधरीसोबत संपर्क कायम ठेवला होता. एवढेच नव्हे तर केतनसोबत ज्या हॉटेलमध्ये ती थांबली होती, त्याच हॉटेलमध्ये आणि त्याच खोलीत नंतर चेतनसोबतही ती गेल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज, हॉटेलच्या नोंदी आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा अधिक स्पष्ट होत आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या सर्व हालचाली पूर्वनियोजित कटाचा भाग होत्या का, याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणातील प्रत्येक पुरावा एकमेकांशी जोडून आरोपींच्या हालचालींचा संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

यापूर्वीच सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून, त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. तपासादरम्यान दोघांच्या नातेसंबंधांबाबत, त्यांच्यातील संवाद तसेच कथित नियोजनाबाबत अनेक महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.

18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेचा तपास पुढे हत्या प्रकरणाकडे वळला. त्यानंतर उघड झालेल्या माहितीमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले असून, तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे धक्कादायक तपशील समोर येत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *