Ahmednagar News : अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चापडगांव व आखेगांव ता. शेवगांव येथे सशस्त्र दरोडा घालणारे 05 आरोपींना 2,49,000 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद केले आहे.
फिर्यादी कमलेश सुभाष वाल्हेकर 21 डिसेंबर 2023 रोजी हे त्यांचे कुटुंबासह घरामध्ये झोपलेले असतांना रात्री 01.00 ते 02.00 वा. चे सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादी तसेच त्यांचे कुटुंबियांना चाकुचा धाक दाखवुन मोबाईल, सोन्या चांदीचे दागिने, मोटारसायकल, टी.व्ही., गॅस शेगडी, 6 शेळ्या असा एकुण 1,08,700 रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकुन चोरुन नेला होता.
तसेच दिनांक 24 डिसेंबर रोजी फिर्यादी अभय राधाकिसन पायघन यांचे घरामध्ये रात्री 01.00 वा. चे सुमारास अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करुन फिर्यादीची आई मंगल पायघन हिचे डोळयाच्या जवळ धारदार शस्त्राने तसेच रामकिसन पांडु काटे यांना मारहाण करुन 50,000 रुपये रोख रक्कम दरोडा टाकुन चोरुन नेली होती.
या घटनेनंतर शेवगांव पोलीस ठाण्यात भादवि कलम 392, 452, 504, 506, 34 व भादवि कलम 394, 452, 457, 380, 506, 511, 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला होता.
या घटनेचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्तबातमीदारा सदरचा गुन्हा हा दिपक गौतम पवार रा. टाकळीअंबड, ता. पैठण याने व त्याचे इतर साथीदारांनी केलेला असुन ते सध्या त्यांचे टाकळीअंबड येथील घरी व घरासमोर असलेल्या पालावर आलेले असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली.
यानंतर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ टाकळीअंबड, ता. पैठण येथे जावुन दिपक गौतम पवार याचे घरास व त्याचे घरासमोरील असलेल्या पालांना चोहोबाजुने सापळा लावला असता सदर पालांमधुन काही इसम जवळच असलेल्या ऊसाचे शेतामध्ये पळुन गेले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी घरातील व पालामधील तसेच ऊसामध्ये जावुन लपुन बसलेल्या इसमांना ताब्यात घेतले.
मिळुन आलेल्या आरोपींची अंगझडती तसेच त्यांचे घराची व पालाची झडती घेता त्यांचेकडे गुन्ह्यातील चोरीस गेले मालापैकी, मोबाईल, रोख रक्कम, शेळ्या, मोटारसायकल असा एकुण 2,49,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आले आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.