DNA मराठी

Ahilyanagar Crime: नगर शहरात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

crime

Ahilyanagar Crime : एका 17 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारिरिक संबंध ठेवुन तिला गर्भवती केल्या प्रकारात स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखे पोउपनि/दिपक मेढे पोलीस अंमलदार गणेश लबडे, फुरकान शेख, दिपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, सुनिल मालणकर, योगेशे कर्डिले, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिवाजी शिंदे, सुर्वणा गोडसे, चालक उत्तरेश्वर मोराळे, अर्जुन बडे यांचे पथक तयार करुन सदर गुन्ह्यातील आरोपीस शोध घेवुन तात्काळ ताब्यात घेणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन सदरचे पथक रवाना करण्यात आले होते.

पथकाने गुन्ह्यातील आरोपीला आण्णाभाऊ साठे चौक, लाल टाकी येथून अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *