BCCI Central Contract: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआय मोठा निर्णय घेत सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार बीसीसीआय त्यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून ए+ ग्रेड काढून टाकण्याचा विचार करत आहे. सध्या ए+ ग्रेडमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा सारखे दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. जर ए+ ग्रेड काढून टाकण्यात आले तर या चौघांनाही मोठ्या प्रमाणावर पगार कपात होणार आहे. बीसीसीआयच्या ग्रेड ए+ कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत, खेळाडूंना दरवर्षी 7 कोटी मिळतात, परंतु ही ग्रेड आता अस्तित्वात राहणार नाही. बीसीसीआय आता फक्त तीन कॅटेगरी राखेल: ए, बी आणि सी.
रोहित आणि विराट कोहलीच्या पगारात लक्षणीय घट
रोहित आणि विराट कोहलीच्या पगारात लक्षणीय घट होईल. त्यांना बी ग्रेडमध्ये हलवले जाईल. सध्या बी ग्रेड खेळाडूंना दरवर्षी 3 कोटी मिळतात. याचा अर्थ विराट आणि रोहितला आता 7 कोटींऐवजी 3 कोटी मिळतील. जडेजा देखील बी ग्रेडमध्ये हलवला जाऊ शकतो, तर जसप्रीत बुमराहला ए ग्रेडमध्ये हलवले जाऊ शकते.
कोणत्या खेळाडू कोणत्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एकूण 34 खेळाडूंना केंद्रीय करार दिले आहेत, त्यापैकी 19 खेळाडूंना सी-ग्रेड करार आहेत. सध्या, पाच खेळाडू बी-ग्रेडमध्ये आहेत. सहा खेळाडू ए-ग्रेडमध्ये आहेत. ए-प्लस श्रेणीमध्ये चार खेळाडू आहेत.
ए-प्लस श्रेणी: रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा.
ए-ग्रेड: मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत.
बी-ग्रेड: सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर.
सी ग्रेड: रिंकू सिंग, टिळक वर्मा, रुतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, इशान किशन, अभिषेक शर्मा, अभिषेक शर्मा, अभिषेक शर्मा, अभिषेक वर्मा.






