Sanjay Raut on BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यामुळे आता मुंबई महापालिकेत भाजपचा पहिल्यांदा महापौर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे सर्व गटांनी ठरवले असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही हा त्यांचा प्रश्न त्यांचा पक्ष भाजपचा अंगवस्त्र आहेत, अमित शहा त्यांचे प्रमुख, ते त्यांच्याकडे जाऊन मागणी करतील, मात्र फडणवीस ऐकणार नाही अशी माझी माहिती आहे.
त्यांनी आपले नगरसेवक बंद ठेवलेत, त्यांनी आमदार फोडले, त्यांना नगरसेवक कोंडून ठेवावे लागतात, ते आमदार सुरतला घेऊन गेले होते.
एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री तरी त्यांना वाटत आपले नगरसेवक पळवले जातील अशी भीती ही किती मोठी हस्यजत्रा आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हे सर्वांनी ठरवलं आहे बघू काय होईल. जे नगरसेवक आहेत त्यात बरेच नवे चेहरे, ते शिवसैनिक आहेत, त्यांना वाटत भाजपचा महापौर होऊ नये
त्यांना कितीही कोंडला तरी खूप साधन आहे. दळणवळणाची साधन आहे, संदेश काही जाऊ शकते. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महत्व महापौर बसू शकतो. पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहे, आम्ही तथास्थ होउन पाहतोय, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा फोन झाला आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले.
तर दुसरीकडे यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, राज्य त्यांचे तरी नगरसेवकांना कोंडून ठेवले, स्वतःला भाई म्हणून घेणारे एकनाथ शिंदेंनी नगरसेवक कोंडून ठेवले. महापौर शिवसेनेचा असतो, डूब्लिकेट शिवसेनेचा नाही, ती अमित शाह यांची सेना आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला महापौर शिवसेनेला पाहिजे, असायला हवा ते आम्ही पाहू, मात्र शिंदेंनी मुंबई भाजपला दिली. 29 नगरसेवक कोंडले तो मराठी अस्मितेचा कोंडमारा, एकनाथ शिंदे सोडले तर हे कोणालाच फरक पडणार नाही.






