DNA मराठी

Pune Election: पुण्यात भाजपने दिला अनेकांना धक्का.., 119 जागा जिंकत मारली बाजी

Pune Election: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणेकरांनी मोठा धक्का दिला आहे. भाजपने या निवडणुकीत तब्बल 119 जागा जिंकत स्वबळावर बहुमत मिळवला आहे. आमही या निवडणुकीत 120-125 जागा जिंकणार असा दावा पुण्यात भाजपकडून करण्यात येत होता. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला अवघ्या 27 जागांवर समाधान मानावे लागले आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता मात्र त्याचा काहीच फायदा पक्षाला झाला नसल्याने आता स्पष्ट झाले आहे.

तर दुसरीकडे पुण्यात युतीसाठी अनेक प्रयत्न करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुण्यात खात देखील उघडता आलं नाही. तर शिवसेना ठाकरे गटाने एका जागेवर बाजी मारली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने देखील या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत 15 जागा जिंकल्या आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 3 जागा मिळाले आहे.

शरद पवार पक्षाची कामगिरी या निवडणुकीत खराब राहिल्याने येणाऱ्या दिवसात पुण्यातील राजकारणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. कधीकाळी बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यात शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

एकूण जागा 165

भाजप- 119

शिवसेना -0

ऊबाठा-1

राष्ट्रवादी शरद पवार -3

राष्ट्रवादी अजित पवार – 27

काँग्रेस -15

एमआयएम-0

अपक्ष-0

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *