DNA मराठी

Jalna Election: पहिल्याच निवडणुकीत जालना महापालिकेवर भाजपचा झेंडा; 41जागांवर मारली बाजी

jalna election

Jalna Election : नव्याने झालेल्या जालना शहर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि या महापालिकेवर तब्बल 41 जागा मिळवत भाजपने इतिहासात पहिल्यांदाच आपला झेंडा रोवला आहे.

जालना शहर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मनसेची युती करत 55 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे सेना यांनी महाविकास आघाडी कायम ठेवत निवडणूक लढविली.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह उद्धव ठाकरे सेनेला या महापालिकेत आपले खातेही उघडता आलेले नाही तर मनसेची ही अवस्था यापेक्षा वेगळे राहिलेली नाही. या संपूर्ण जालना शहर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना तसेच काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढती झाल्याचे दिसून आले.

काही ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या त्यात भाजपाच्या उमेदवारांची सरशी झाली. जालना महापालिकेचा पहिला महापौर भाजपाचा होणार असल्याने जालन्यातील माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे यांचे वजन पक्षश्रेष्ठींकडे आपसुकच वाढले आहे.

या निवडणुकीत भाजपला 41 जागा, शिवसेनेला 12 काँग्रेसला 09, एमआयएमला 02 आणि अपक्ष 01 जागी निवडून आला आहे. या निवडणुकीत एकूण स्थिती पाहता भाजपने महापालिकेत एक हाती सत्ता मिळविल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *