Asaduddin Owaisi : अहिल्यानगर महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 4 मध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना नगरचा महापौर आम्ही ठरावावर असा दावा एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केल्याने शहरातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त आणि जर त्यांनी पैसे वाटले तर पैसे घ्या आणि त्या पैशातून त्यांच्याच नावाने शौचालय बांधा असा टोला देखील लावला आहे.
बिहारमध्ये पाच जागा जिंकल्या. तिथे महिलांनी एकत्र येऊन एमआयएमला मतदान केलं. पुरुषांनी मतदान दिलं नाही तरी त्यांच्या घरातील महिलाच एमआयएमला मत देणार. एमआयएमला इथवर पोहोचवण्यात महिलांचा वाटा सर्वात मोठा आहे असं देखील या सभेत बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
महापौर नगरचा MIM च ठरवेल
जर तुम्ही आमचे सहा उमेदवार जिंकून दिले तर आम्ही नगरचा महापौर ठरवणार असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. तसेच या निवडणुकीत मला पूर्ण विश्वास आहे हे जालीम हरतील. घरातील महिलांनी आम्हाला लढायला शिकवलं,असं सांगत त्यांनी मतदारांना निर्भय मतदानाचं आवाहन केलं. विरोधक पैशाच्या जोरावर लढत आहेत पैसे न पाहता विकास पाहा. 15 तारखेला न घाबरता मतदान करा असा स्पष्ट संदेश दिला.






