DNA मराठी

Mukesh Ambani : जगातील सर्वात श्रीमंत 10 कुटुंबांच्या यादीत अंबानी कुटुंब कोणत्या क्रमांकावर?

mukesh ambani

Mukesh Ambani : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असणारे मुकेश अंबानी नेहमी सोशल मीडियावर काहींना काही कारणाने चर्चेत राहतात. कधी जिओमुळे तर कधी एखाद्या व्यावसायिक करारामुळे मुकेश अंबानी चर्चेत राहतात. मात्र आता मुकेश पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. या पाठीमागचे कारण म्हणजे नुकतंच जगातील 10 सर्वात श्रीमत कुटुंबीयांचे नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुकेश अंबानी यांचे अंबानी कुटुंब आठव्या स्थानावर आहे. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने अहवाल सादर केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने जारी केलेल्या अहवालानुसार, जगातील दहा सर्वात श्रीमंत कुटुंबियांच्या यादीत अंबानी कुटुंब आठव्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती $105.6 अब्ज इतकी आहे. तर या यादीत वॉल्टन   कुटुंब पहिल्या स्थानावर असून त्यांची संपत्ती $513.4 अब्ज इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अल नाहयान कुटुंब असून त्यांची संपत्ती $335.9 अब्ज इतकी आहे.

तर तिसऱ्या क्रमांकावर अल सौद कुटुंब असून त्यांची संपत्ती $216.6 अब्ज इतकी आहे. चौथ्या क्रमांकावर अल थानी कुटुंब असून त्यांची संपत्ती $199.5 अब्ज इतकी आहे. तर पाचव्या क्रमांकावर हर्मेस कुटुंब असून त्यांची संपत्ती $184.5 अब्ज इतकी आहे.

सहाव्या क्रमांकावर कोच कुटुंब असून त्यांची संपत्ती $150.5 अब्ज इतकी आहे. याच बरोबर सातव्या क्रमांकावर मार्स कुटुंब असून त्यांची संपत्ती $143.4 अब्ज इतकी आहे. तर आठव्या क्रमांकावर अंबानी कुटुंब असून त्यांची संपत्ती $105.6 अब्ज इतकी आहे. नवव्या क्रमांकावर वेर्थाइमर कुटुंब असून त्यांची संपत्ती $85.6 अब्ज इतकी आहे. तर दहाव्या क्रमांकावर थॉमसन कुटुंब असून त्यांची संपत्ती $82.1 अब्ज इतकी आहे.

जगातील 10 सर्वात श्रीमंत कुटुंबे:

01.  वॉल्टन कुटुंब – $513.4 अब्ज

02.  अल नाहयान कुटुंब – $335.9 अब्ज

03.  अल सौद कुटुंब – $216.6 अब्ज

04. अल थानी कुटुंब – $199.5 अब्ज

05. हर्मेस कुटुंब – $184.5 अब्ज

06.  कोच कुटुंब – $150.5 अब्ज

07.  मार्स कुटुंब – $143.4 अब्ज

08.  अंबानी कुटुंब – $105.6 अब्ज

09.  वेर्थाइमर कुटुंब – $85.6 अब्ज

10. थॉमसन कुटुंब – $82.1 अब्ज

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *