Renovation Construction : इस्रायल देशामध्ये बांधकाम व नूतनीकरण (Renovation Construction) क्षेत्रात युवकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील नोकरीस इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त रवीकुमार पंतम यांनी केले आहे.
बांधकाम व नूतनीकरण क्षेत्रामध्ये प्लास्टरिंग वर्क्स आणि सिरॅमिक टाइलिंगसाठी प्रत्येकी १ हजार जागा, ड्रायवॉल वर्करसाठी ३०० जागा, तर मॅसनसाठी ३०० जागा उपलब्ध आहेत.
वरील पदांसाठीची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्जाबाबतची माहिती https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदभरतीबाबत अधिक माहितीसाठी ०२४१-२९९५७३५ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा वसीम पठाण यांच्याशी ९४०९५५५४६५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.






