Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान पार पडला आहे. या निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याआधी निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार होते मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पुण्यात बोलताना सपकाळ म्हणाले की, नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये यावेळेस मोठ्या प्रमाणावर धांदल झाली. प्रशासकीय धांदल आणि मतांची धांदल देखील या निवडणुकीत दिसली. निवडणूक आयोग हा नशापाणी करून काम करत आहे की आयोग सरकारच्या हातचा बाहुला आहे असा प्रश्न पडला आहे. निवडणूक आयोग ही कटपुतली आहे मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत आहे असं सपकाळ म्हणाले. तर040 तास आधी मतदान पुढ ढकलणे, मतमोजणी पुढे ढकलल्याने निवडणूक आयोगाचे वाभाळे निघाले आहेत. निवडणूक आयोग कमी पडल आहे. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुका केल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
पैसे खाऊन भारतीय जनता पार्टी ही गब्बर झाली
पैसे खाऊन भारतीय जनता पार्टी ही गब्बर झाली आहे सगळ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. पैसा फेक तमाशा देख असं भाजप करत आहे.
राज्यभरात 25 हजार तक्रारी आल्या असाव्यात. आज सगळी पायमल्ली झाली आहे.आजच्या निवडणुकीने लोकशाहीला मोठा फटका बसला आहे असं देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.






