Gautam Gambhir : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यान सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाला आहे. ज्यामुळे सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. या व्हायरल पात्रता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मात्र गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे का? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वरील व्हायरल पोस्टनुसार, त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
गौतम गंभीरचा फोटो असलेल्या या सोशल मीडिया पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “मी आज अधिकृतपणे प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत आहे. भविष्यात मला कोणत्याही पदावर क्रिकेटच्या जगात सहभागी व्हायचे नाही. खरे सांगायचे तर, सततच्या टीका आणि ट्रोलिंगला मी कंटाळलो आहे. मी माझे सर्वस्व या खेळासाठी दिले. पण माझ्या सभोवतालचे वातावरण, विशेषतः ऑनलाइन, स्पष्टपणे दर्शवते की माझा वेळ संपला आहे. मी डोके उंच ठेवून हे पद सोडत आहे. भविष्यासाठी भारतीय क्रिकेटला शुभेच्छा. तुम्ही असेच यशस्वी होत राहा. आठवणींसाठी धन्यवाद.”
व्हायरल सोशल मीडिया पोस्टची तपासणी
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरच्या राजीनाम्याबाबत व्हायरल पोस्ट अधिकृत ‘X’ हँडलवरून पोस्ट करण्यात आली नव्हती. गौतम गंभीरचा अधिकृत ‘X’ हँडल @GautamGambhir आहे, तर व्हायरल पोस्ट @imRavY_ वरून आहे. व्हायरल पोस्ट बनावट असल्याचे स्पष्ट आहे. व्हायरल पोस्टमध्ये (Gaotam Gambhir) नावाचे स्पेलिंग देखील चुकीचे आहे. व्हायरल पोस्टवर ब्लू टिक असले तरी, ‘X’ ने ते बनावट घोषित केले आहे. शिवाय, गौतम गंभीरच्या राजीनाम्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून किंवा कोणत्याही विश्वसनीय सूत्राकडून कोणतीही बातमी आलेली नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान गौतम गंभीरच्या राजीनाम्याच्या दाव्याची वेळ देखील संशयास्पद आहे.






