Girish Mahajan : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जामनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच भाजपाचे सहा नगरसेवकदेखील बिनविरोध निवडून आले आहेत.
जामनेर नगरपालिका निवडणुकीत माघारीच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले तीनही अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून साधना महाजन यांनी, तर महाविकास आघाडीकडून रूपाली ललवाणी, प्रतिभा झाल्टे आणि सरिता बोरसे यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र तिन्ही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली.
नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीबद्दल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
तर दुसरीकडे आतापर्यंत राज्यातील एकूण तीन नगरपालिकांमध्ये भाजपचे तीन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बिनविरोध निवडणून आले आहे.






