Maharashtra Politics: राज्यात साध्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अनेक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने मोठ्या प्रमाणात एका पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहे.
यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेला कल्याण डोंबिवलीमधील अनेक लोकांना भाजपने पक्षात घेतल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भाजपवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू झाली आहे.
आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या एकही मंत्रीने हजेरी न लावण्याने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, प्री कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आणि भाजपा युतीचा धर्म पाळत नसल्याची सर्व मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर केली.
त्यामुळे भाजपच्या या घटनेचा निषेध म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवनेचे मंत्री कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिले नाहीत अशी माहिती समोर आली आहे.






