DNA मराठी

Sharad Pawar: निवडणुका जाहीर होताच अहिल्यानगरसाठी शरद पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Sharad Pawar: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून संपूर्ण राज्यात 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी देखील कंबर कसली असून सर्व राजकीय पक्षाकडून बेरीज वजाबाकीचे राजकारण सुरू झाले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोठा निर्णय घेत अहिल्यानगर जिल्ह्याची कमान माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्याकडे सोपवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी वैयक्तिक कारणामुळे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठा निर्णय घेत अहिल्यानगर जिल्ह्याची कमान माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्याकडे सोपवली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात शरद पवार यांचे विश्वासू अशी माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांची ओळख आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी पक्षाचे सोपवली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे माजी आमदार दादाभाऊ कळमकर आता कोणत्या पद्धतीने पक्षाला एकत्र करून निवडणुकीचा सामना करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *