DNA मराठी

Maharashtra Local Body Election: निवडणुकीचा बिगुल वाजला; नगरपालिका, नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान अन् 3 डिसेंबरला निकाल

election

Maharashtra Local Body Election: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पहिल्या टप्प्यात निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. 288 सदस्य निवडले जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

तसेच या निवडणुकीसाठी 7 नोव्हेंबरला मतदान याद्या जाहीर होणार असल्याची माहिती देखील राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. तर 31 ऑक्टोबरच्या मतदान यादीनुसार मतदान होणार असं देखील आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याच बरोबर 2 डिसेंबरला मतदान होणार आणि 3 डिसेंबरला निकाल येणार असल्याची माहिती आयोगाच्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

निवडणुकीत खर्चाची मर्याद वाढवण्याचा निर्णय

खर्च मर्यादा

अ वर्ग, नगर परिषद, अध्यक्ष पदासाठी- 15 लाख

सदस्य-5 लाख

ब वर्ग नगर परिषद अध्यक्ष- 11 लाख 25 हजार

ब वर्ग नगर परिषद सदस्य -3 लाख 50 हजार

क वर्ग नगर परिषद अध्यक्ष- 7 लाख 50 हजार

क वर्ग नगर परिषद सदस्य – 2 लाख 50 हजार

नगर पंचायत अध्यक्ष- 6 लाख

नगर पंचायत सदस्य – 2 लाख 25 हजार

असा असणार नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुक कार्यक्रम

अधिसूचना प्रसिद्धी उमेदवारी अर्ज दाखल करणे – 10 नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस – 17 नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज छाननी – 18 नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज माघार – 21 नोव्हेंबर

मतदान – 2 डिसेंबर

मतमोजणी – 3 डिसेंबर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *