Imtiaz Jaleel On Sangram Jagtap : अहिल्यानगर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नगर शहरात चिकनी चमेली राहत असून काम न करता फक्त हिंदू मुस्लिम करत असल्याची टीका त्यांनी नाव न घेता आमदार जगताप यांच्यावर केली आहे.
या सभेत बोलताना आम्ही पंतप्रधान मोदींना उत्तर देतो तर तू कोण? तू तर चिल्लर आहे असा टोला देखील माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगताप यांना लावला.
तर दुसरीकडे त्यांनी नगर – औरंगाबाद रस्त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आव्हान करत मी 20 हजार रुपये देतो तुम्ही एकदा नगर – औरंगाबाद रस्त्यावर प्रवास करा असं म्हटले आहे. तसेच आमच्या पक्षावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो मात्र मी जेव्हा आमदार आणि नंतर खासदार झालो तेव्हा मी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता अशी आठवण देखील जलील यांनी विरोधकांना करून दिली.
तर दुसरीकडे नगर शहरात एक विषारी साप असून तो दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र त्याच्या विष मध्ये दम नाही अशी टीका फारुख शाब्दी यांनी आमदार जगताप यांच्यावर केली.