Rohit Pawar: जळगाव शहरात आयोजित एका शालेय क्रिकेट स्पर्धेच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आज भेट देत महाराष्ट्र आणि उत्तराखंड संघातील सामना पाहिला. सामना संपल्यानंतर त्यांनी स्वतः मैदानात उतरून काही फटकार ठोकत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. खेळ संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय क्षेत्रात येताना येणाऱ्या ‘गुगली, स्पिन आणि स्पेस’ डिल करणं शिकावं लागतं असं सांगितलं.
पण, ‘गावठी शॉट’ म्हणजेच खालच्या पातळीचं वक्तव्य टाळावं लागतं, असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. यावेळी रोहित पवार यांनी मराठी मीडियालाही आपला ‘कोच’ संबोधत, “मीडिया वेळोवेळी वेडी वाकडी पण अभ्यासपूर्ण प्रश्न विचारतं. त्यांना टाळण्यापेक्षा योग्य उत्तरं देण्याचा प्रयत्न केल्यामुळेच मी कोणत्याही वादात अडकलेलो नाही,” अशी प्रतिक्रिया देखील रोहित पवार यांनी दिली.