Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांना अहिल्यानगर शहरात सभेसाठी पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.
खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा नगर शहरातील मुकुंदनगर भागातील सीआयव्ही कॉलनी ग्राउंड येथे संध्याकाळी 7.00 वाजता होणार आहे. यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी काही अटी व शर्ती ठेवून ओवैसी यांना सभेसाठी परवानगी दिली आहे.
सभेसाठीच्या अटी व शर्थी
१) जाहिर सभा घेण्याकरीता आवश्यक लागणा-या परवानगी स्थानिक स्वाराज्य संस्था यांचेकडुन घेवुनच सभा घ्यावी. [स्टेज, मंडप उभारणी, एम एस ई बी, पार्कीग व्यवस्था, आरोग्य विभाग, अग्निशमक विभाग इत्यादी। त्याबाबचे मंजुरी पत्र सादर करावे.
२) जाहिर सभा घेत असताना फायर ब्रिगेड, ॲम्बुलन्स, अती महत्वाचे वाहने, अत्यावश्यक वस्तु वाहतुक करणारे वाहने येण्या जाणेसाठी अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन पार्किंग व्यवस्था करावी. सदर पार्किंग ठिकाणी आपले स्वयंसेवक नेमावेत. वाहतुक पोलीसांच्या सुचनांचे पालन करावे.
३] आपले पक्षाचे खासदार बें अससुददीन ओवेसी यांना झेड वर्गवारीची सुरक्षा आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी ४५ बाय ६० फुट लांबी रुंदीचे डी झोन तयार करुन स्टेजची व्यवस्था करावी. तसेच स्टेजवर बसणा-या प्रमुखांची नावांची यादी आगाऊ उपलब्ध करुन देवुन त्यांचे पास आमचेकडुन घ्यावेत. स्टेज सुरक्षामध्ये कोणताही निष्काळी पणा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४) सभेच्या ठिकाणी सुरक्षाच्या अनुषंगाने सभेचे ठिकाण चारही बाजुने सुरक्षीत करुन समक्ष दिलेल्या सुचनेप्रमाणे स्वतंत्र प्रवेश व्दाराची व्यवस्था करावी जेणेकरुन सुरक्षा अनुषंगाने सोयीचे होईल याबाबत काटेकोरपणे पालन करावे.
५) जाहिर सभेच्या अनुषंगाने लावण्यात येणारे झेंडे, पोस्टर्स व बॅनर्स याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेची स्वतंत्र पारवानगी घेवुन सादर करावी.
६) आपण लावण्यात आलेल्या झेंडे व पोस्टर्स व बॅनर्स व इतर जाहिरातीमुळे कोणत्याही धर्माच्या/जातीच्या भावना दुखवतील असे वक्तव्य अथवा देखावे अथवा विभिस्त किंवा मना दुखवतील असे गाणी पोस्टर्स लावू नयेत.
७] जाहिर सभा अयोजित करताना असताना कोणावरही आपले कार्यकर्ते जबरदस्तीने सहभागी करणार नाही याची दक्षता घ्यावी. जाहिर सभा ही शांततेने व सुरळीत पार पाडणेसाठी पोलीस ज्या ज्या वेळी मिटिंगसाठी बोलविले जाईल त्यावेळेस हजर राहुन त्यावेळी देणेत आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे.
८) जाहिर सभा मध्ये महिला व मुली सहभागी असतील तर त्यांची गैर सोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. शक्यतो महिला व पुरुष असे दोन वेगवेगळे भाग करावेत.
९] जाहिर सभा असताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेचा/मार्गाचा वापर करावा. जाहिर सभा घेण्यापुर्वी अथवा नंतर कोणतीही रॅली काढता येणार नाही. सभेकरीता येणारे वक्ते यांना झेड सुरक्षा असलेने त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव कोठेही पोलीसांच्या परवानगी शिवाय दौ-यात बदल करता येणार नाही.
१०) जाहिर सभा च्या वेळी अत्यावश्यक सेवा चालु राहितील तसेच आपले समर्थकाकडुन त्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
११] जाहिर सभेच्या दरम्यान अथवा नंतर आपले कार्येकर्ते यांचेकडुन कोणत्याही शासकीय अथवा खाजगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
१२] सभेच्या ठिकाणी लाईट, स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पार्किंग याची सभेला येणा-या नागरिकांचे प्रमाणात पुरेशी सोय करण्यात यावी.
वरील नियम व अटीचे पालन करुन याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र व सबंधिकत विभागाचे परवानगी पत्र असे संपुर्ण बाबीची पुर्तता करुन याबाबतचा पुर्तता आहवाल दि. २८/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा शिवाजीनगर पोलीस ठाणेस सादर करावेत. आपण वरील बाबीची पुर्तता न केल्यास आपला परवानगी अर्ज नामंजूर करुन मा. वरिष्ठ कार्यालयात अहवाल सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.