DNA मराठी

Laxman Hake : मोठी बातमी, अहिल्यानगरमध्ये खळबळ; लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर हल्ला

laxman hake

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार अहिल्यानगर तालुक्यात खडकी परिसरात हाके यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. सध्या या प्रकरणामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात हाके यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या असल्याचे समजते. या घटनेची माहिती कळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर जारी केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागात लक्ष्मण हाके सभा घेत मराठा आरक्षणासाठी काढलेला जीआर रद्द करण्यात यावा अशी मागणी करत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *