Asia Cup 2025 Final : आशिया कपच्या इतिहासात प्रथमच भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात भिडणार आहे. सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करत आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
तर दुसरीकडे या स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाने एकही सामना न गमावता फायनलमध्ये शानदार प्रवेश केला आहे.
सुपर फोर टप्प्यात बांगलादेशला हरवून पाकिस्तानने आशिया कप 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सुपर फोरच्या गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान तीन सामन्यांपैकी दोन विजय आणि एका पराभवासह दुसऱ्या स्थानावर आहे.
अंतिम फेरीत पहिला सामना
आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी, तीनपेक्षा जास्त संघांचा समावेश असलेल्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन्ही संघ पाच वेळा अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल आणि क्रिकेट चाहत्यांसाठी एक उत्सव असेल.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामना
25 सप्टेंबर रोजी सुपर 4 सामन्यात पाकिस्तान आणि बांगलादेश आमनेसामने आले. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत पाकिस्तानने त्यांच्या पहिल्या डावात 135 धावा केल्या. मोहम्मद हरिसने 23 चेंडूत 31 धावा केल्या, तर मोहम्मद नवाजने 25 धावा जडून संघाला चांगली सुरुवात दिली.
लक्ष्य पाठलाग करताना बांगलादेश फलंदाजीत कमकुवत ठरला. सलामीवीर परवेझ हुसेन इमॉन शून्यावर बाद झाला, तर तौहिद हृदयॉयने फक्त पाच धावा जोडल्या. शमीम हुसेनने 30 धावा केल्या, परंतु संघ अखेर 124 धावांवर गुंडाळला गेला. पाकिस्तानने सामना 11 धावांनी जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.