Sawedi Land Scam : सावेडी परिसरातील भूखंड प्रकरण अनेक दिवसापासून नगर जिल्ह्यात गाजत होता. या प्रकरणात आतापर्यंत एकही वारस समोर आलेला नव्हता. मात्र, या प्रकरणातील जमिनीत अखेर वंशावळ दाखल करत नाव नोंदणीसाठी अर्ज केला आहे, अखेर या प्रकरणात नाही म्हणता म्हणता वारस समोर आल्याने अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होणार आहेत.
विशेष म्हणजे, या प्रकरणात कासम डायाभाई अजीज यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज सादर करून गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या अर्जानुसार, सर्व्हे नं. २४५/ब/१ या जमिनीवरील लेख दुरुस्ती अपर तहसीलदार यांच्याकडे दाखल केला आहे मात्र त्या दस्तावर साक्षीदार म्हणून सही घेण्यात आलेली आहे त्या सही वर त्यांनी शंका उपस्थित करून त्यांची सही बनवत असल्याची शंका व्यक्त केली आहे. कासम यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, त्यांनी कधीही अशा प्रकारची लेख दुरुस्ती केलेली नाही.
या संदर्भात प्रशासनात चौकशी सुरु असून, संबंधित दस्तऐवजांवरही विविध आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
शैलाह रफिक आणि शमिरा डायाभाई या सख्ख्या बहिणी असून त्यांचा वडील डायाभाई वेलजी मयत आहेत. डायाभाई यांना चार मुले होती – शैलाह, शमिरा, शाजीद व अजिज. मात्र, शाजीद २०२० तर अजिज २०२५ मयत झालाय. अजिज मयत झाल्यानंतरच या प्रकरणात संशयित खरेदीखत एक महिन्यांनी दाखल करण्यात आले होते यावरही शंका उपस्थित झाली होती,
कासम यांना फेरफार क्रमांक १४२०६ प्रमाणे वेगळ्या जमिनीचा (सर्व्हे नं. २४६/अ) वाटप करण्यात आले असून, सर्व्हे नं. २४५/ब/१ या जमिनीशी त्यांचा कोणताही संबंध नाही, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अर्जदार शैलाह व शमिरा हे वडील डायाभाई यांचे एकमेव वारस असल्याचे सांगितले आहे.
मौजे सावेडी, ता. नगर, जि. अहिल्यानगर येथील सावेडी नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं. २४५/ब/१, क्षेत्रफळ ७२.०० हेक्टर आणि आकारफळ १४३.५७ चौ.मी. या मिळकतीवर कातडे, हाडे व साल कारखाना असून अहमदनगर महानगरपालिकेचा लायसन्स क्रमांक – १९७अ आहे.
सदर जमिनीवर त्यांच्या नावांची वारस नोंद करण्यात यावी. संबंधित अर्ज दिल्याचे समजते,
या प्रकरणांमध्ये यापूर्वी वारस जिवंत नसल्याचे दावे प्रति दावे करण्यात आले होते परंतु आत्ता वारस आल्याने या प्रकरणांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत.