Share Market Today : गणेश चतुर्थीच्या सुट्टीनंतर आज शेअर बाजारात पुन्हा एका मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अमेरिकेने २७ ऑगस्टपासून २५% अतिरिक्त टॅरिफ लादण्याच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच भारतीय बाजारात परिणाम दिसून येत आहे.
सकाळी ९.१५ वाजता बाजार उघडताच, ट्रम्प कर आकारणीचा परिणाम दिसून आला आणि सेन्सेक्स २५० अंकांच्या घसरणीसह व्यवहार सुरू झाला, तर सकाळी ९.३७ वाजता बीएसई ६५० अंकांपेक्षा जास्त घसरणीसह ८०,१०८.४१ अंकांवर व्यवहार करत होता. त्याच वेळी, निफ्टी ५० उघडताच १२४ अंकांनी घसरला आणि २४५७७ अंकांवर उघडला. निफ्टी बँक ५४००३ अंकांवर उघडला, ४४०.३० अंकांनी घसरला.
या शेअर्सवर सर्वाधिक परिणाम
सेन्सेक्सच्या शेअर्सवर आज सर्वाधिक दबाव एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, बीईएल, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एनटीपीसी यांच्यावर दिसून आला.
दुसरीकडे, इटरनल, एचयूएल, एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्ह, टायटन आणि एल अँड टी यांचे शेअर्स वधारले.
ट्रम्प टॅरिफमुळे बाजार कोसळला
अमेरिकेने बुधवारपासून भारतीय उत्पादनांवर २५% अतिरिक्त टॅरिफ लादला आहे. त्याचा सर्वात मोठा परिणाम कापड, रत्ने आणि दागिने, कार्पेट, फर्निचर आणि कोळंबी उद्योगावर होण्याची अपेक्षा आहे.
४.१४ लाख कोटी रुपयांचे शेअर्स बुडाले
सत्रात बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक १% पेक्षा जास्त घसरले. जोरदार विक्रीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ४.१४ लाख कोटी रुपयांची घट झाली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रात ४४९ लाख कोटी रुपयांवरून सुमारे ४४५ लाख कोटी रुपयांवर आले.