DNA मराठी

Manoj Jarang On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस साहेब मला गोळ्या घाला, मी मुंबईला येतोय

manoj jarang attack on cm devendra fadnavis

Manoj Jarang On Devendra Fadnavis: राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमधून मुंबईसाठी निघाले आहे. जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आरक्षणासाठी आंदोलन करणार आहे.

मुंबईसाठी निघण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत मी मुंबईत येत आहे, देवेंद्र फडणवीस साहेब मला गोळ्या घाला असं म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकार हिंदू विरोधी काम का करत आहे. आम्ही मुंबईला जाणार. आम्ही हिंदू आहे. आमच्या अंदोलनाच्या वेळी देव पुढे घालतात. आम्ही न्यायालचा आदर करतो. आम्ही शांततेत येणार आहे. असं जरांगे पाटील म्हणाले.

तर यावेळी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर देखील प्रतिक्रिया दिली. याचिका कालच दाखल केली आणि निकाल पण कालच लावला. सरकारने नवीन आणला आहे. आम्ही लेखी अर्ज केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा डाव सादला. आत्ता ही लोकशाही राहिली नाही. कायदा पण एकाच दिवसात स्तफान केला. आम्हाला परवानगी द्याची का नाही हे सरकार ठरवणार. नवीन दिपर्मेट कोणालाच माहिती नाही

मराठ्यांचा पोरांनो कोणीही आत्महत्या करू नका. देवेंद्र फडणवीस साहेब मला गोळ्या घाल मी मुंबईला येत आहे. गोरगरीबाच्या पोरांच्या हक्कासाठी लढतोय. फक्त मला सात द्या. जो कोणी लोकप्रतिनिधी समाजाचं काम करणार नाही त्याला त्याची जागा दाखवा. सर्व समाज बदवाणी आंदोलन ना वर लक्ष राहूद्या. कोणी ही आत्ता बेसवाद पणे वागू नका. आत्ता आंदोलन हे निर्णयक वळणावर आलं आहे. असं देखील जरांगे पाटील म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *