Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वाद पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पालकमंत्रीपदासाठी प्रयत्न करत आहे तर नाशिकमध्ये तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत आहे. तर आता नाशिक जिल्ह्यात एकच पक्षाचे 7 आमदार असलेल्या पक्षाला पालकमंत्री पद मिळाले पाहिजे अशी मागणी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकचा पालकमंत्री कोणालाही होऊ द्या. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मी नसतो. रायगडमध्ये आमची एक सीट असताना, आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरला आहे. नाशिक जिल्ह्यात आमचे 7 आमदार असताना, पालकमंत्री पदासाठी आमच्या लोकांना आग्रह धरायला लावेल. असं छगन भुजबळ म्हणाले.
तसेच 7 आमदार एकच पक्षाचे असतील, तर त्या पक्षाला पालकमंत्री पद मिळाले पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
अजित पवार आणि सुनील तटकरेंशी मी बोलेन, एक आमदार असताना आपण पालकमंत्री पदासाठी आग्रह धरतो, तर 7 आमदारांसाठी पालकमंत्री पदासाठी शक्ती लावा. पालकमंत्री पद मिळाले, तर इच्छुक नाही तर नाही
सर्व मंत्र्यांमध्ये 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टचे झेंडावंदन जास्तीत जास्त मी केल आहे. 1991 पासून मी झेंडावंदन करतो आहे. त्यामुळे मला त्याचे काही दुःख नाही. असं देखील छगन भुजबळ म्हणाले.