DNA मराठी

गोव्यातून दंगल नियोजनाचा फडणवीसांचा प्लॅन; Manoj jarang यांचा खळबळजनक दावा

Manoj jarang : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून मराठा नेत्यांना संपवण्याचे काम करत आहेत आणि मराठा अधिकाऱ्यांना त्रास देत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हंटल आहे. सोबतच प्रशासनातील मराठा अधिकाऱ्यांना त्रास होत असेल तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याचा आवाहन जरांगे यांनी केल आहे. आपला रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का? असं विचारले असता, केवळ एकनाथ शिंदेच नाही तर सरकारमधील सर्वच मराठा नेत्यांना संपवण्याच काम ते करत असल्याच जरांगे म्हणाले. त्यासाठी फडणवीस यांनी प्रत्येक मराठा मंत्र्यांनी सोबत त्यांचा मर्जीतील ओएसडी दिला आहे असा आरोप त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती आतल्या गाठीचा असून सत्तेवर येण्यासाठी जे लोक त्यांच्याकडे कधीच जाऊ शकत नाही त्यांना देखील त्यांच्याकडे येण्यास भाग पाडले. नारायण राणे, एकनाथ शिंदे ,अजित पवार , अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांवर त्यांनी डाव टाकल्याचे जरांगे म्हणाले. त्यामुळे सरकारमधील सर्व मराठा मंत्र्यांनी आणि नेत्याने देखील सावध व्हा अस जरांगे म्हणाले.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यामध्ये ओबीसींचा मेळावा घेऊन आपल्या आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन केला असल्याचा आरोप मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

फडणवीस कोणाचेच काम करत नाहीत गोरगरीब असो ओबीसी असो की मराठा कोणाचे कोणाचेही आरक्षण किंवा काम ते पटकन करत नाहीत आता त्यांनी ओबीसी साठी लढणार असल्याचं म्हटलं आहे मग मराठ्यांसाठी कोण लढणार असा सवाल उपस्थित करत गोव्यामध्ये भाजपमधील ओबीसींच्या मेळाव्यात मुंबईला येणाऱ्या मोर्चामध्ये दंगल घडवण्याची आखणी केली असल्याचा अंदाज आहे मात्र मोर्चामध्ये काही झालं तर फडणवीस जबाबदार असतील अस जरांगे यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *