Ahilyanagar Crime: अहिल्यानगरच्या राहुरी येथे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड झाले असून बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे मशीन आणि इतर साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन दोन इसम नगरच्या दिशेने येत असताना सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी तिन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पाचशे रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण 75 बंडल 37 लाख 50 हजार रुपये व दोनशे रुपये चलनाच्या बनावट नोटा एकूण 44 बंडल ज्याची किंमत या आरोपींकडून 8 लाख 80 हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहे.
तर नोटा बनवण्याचे साहित्य 18 लाख रुपये असे एकूण तब्बल 70 लाख 73 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करत आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.