DNA मराठी

उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर; मंत्री गिरीश महाजन भडकले

Girish Mahajan on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर असल्याची अशी टीका जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. ते आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर आहे. संजय राऊत संघटनात्मक बैठक घेऊन गेले.

पुढच्या आठ दिवसात बघा, त्यांच्याकडे कोण राहणार कोण राहणार नाही. संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे देखील परेशान असतील. पण आता तो विषय आऊट ऑफ कंट्रोल झाला आहे. त्यांच्या बडबडीमुळे हा पक्ष आता मी सांगू शकत नाही, पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत. संजय राऊत यांच्या बद्दल उत्तर देण्यासाठी काही पुरेसे नाही. अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंवर केली.

माध्यमांशी पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले की,

संजय राऊत यांना तुम्ही देखील जास्त प्रसिद्धी देऊ नये आणि त्यांना जास्त मनावर घेऊ नका. कोण अनाथ झाले कोणी दत्तक घेतले, लोक मतदान करतील. तुमची बडबड तुमचे विचार काय हे बघू .निवडणुकीला सामोरे या त्यानंतर आपण भेटू असं देखील यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

तर यावेळी त्यांनी नाशिक पालकमंत्री पदाच्या वादावर देखील भाष्य केले आहे. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, पालकमंत्री पदावर मुख्यमंत्री महोदयांनी तुम्हाला उत्तर दिले आहे. मी त्यावर काही वेगळं बोलू शकत नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे, मोठी जबाबदारी आहे त्या संदर्भात काम सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *