DNA मराठी

IPL 2025 : एमएस धोनी निवृती घेणार? स्वतः केली मोठी घोषणा

IPL 2025: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल 2025 खूप खराब केला असून या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये संघाला पोहचता आलेला नाही. मात्र संघाने या स्पर्धेचा शेवट विजयाने केला आहे.

डेव्हॉन कॉनवे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांच्या अर्धशतकांनंतरच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर धोनीच्या संघाने रविवारी त्यांच्या शेवटच्या लीग सामन्यात गुजरात टायटन्सचा 83 धावांनी पराभव केला.

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2025 मध्ये 14 पैकी फक्त चार सामने जिंकले आणि 10 सामने गमावले. संघ आठ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये सर्वात खाली 10 व्या स्थानावर राहिला.

आयपीएल 2025 मधून बाहेर पडल्यानंतर आता धोनीच्या भविष्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. चाहत्यांना वाटले की हा धोनीचा शेवटचा हंगाम आहे आणि तो या हंगामानंतर निवृत्त होईल. पण हंगाम संपल्यानंतर, 43 वर्षीय धोनीने त्याचे पत्ते उघड केले आहेत. सीएसकेच्या कर्णधाराने पुढील हंगामात खेळणार की नाही हे सांगितले आहे.

सामन्यानंतर धोनी म्हणाला, “आमचा हंगाम चांगला नव्हता, पण हा एक उत्तम कामगिरी होता. या हंगामात आमचे क्षेत्ररक्षण चांगले नव्हते, पण आज आम्ही अनेक चांगले झेल घेतले. निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे 4-5 महिने आहेत, घाई नाही.”

तो म्हणाला, “शरीर तंदुरुस्त ठेवणे महत्वाचे आहे. आता मी रांचीला जाईन, काही बाईक राईड्सचा आनंद घेईन. मी असे म्हणत नाही की मी आता निवृत्त होत आहे, आणि मी असे देखील म्हणत नाही की मी परत येत आहे. माझ्याकडे खूप वेळ आहे. मी विचार करेन आणि नंतर निर्णय घेईन.”

आयपीएल 2025 मध्ये धोनीची कामगिरी कशी होती?

आयपीएल 2025 मध्ये गुजरातविरुद्ध संघाच्या शेवटच्या लीग सामन्यात धोनीला फलंदाजीची संधी मिळाली नाही. धोनीने आयपीएल 2025 मध्ये 13 डावांमध्ये 135.17 च्या स्ट्राईक रेटने 196 धावा केल्या. त्याने या हंगामात 12 चौकार आणि 12 षटकार मारले. आयपीएल 2025 च्या काही सामन्यांनंतर धोनी सीएसकेचा कर्णधार बनला, परंतु त्याच्या नेतृत्वाखालीही संघाची कामगिरी निराशाजनक राहिली.