DNA मराठी

शहरात बोगस तृतीयपंथी अन् व्यापाऱ्यांची लूट; जिल्हाध्यक्ष काजल गुरूंनी प्रकरण आणले उघडकीस

Kajal Guru : नगर शहरामध्ये बोगस तृतीयपंथी म्हणून सर्वसामान्य नागरिकांना पैशांसाठी लूटमार करून दमदाटी करत असल्याची घटना काही दिवसापासून घडत असून याबाबतची माहिती नागरिकांनी तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष काजल गुरु यांना दिली होती.

या तक्रारीची दखल घेऊन काजल गुरु यांनी सदर व्यक्तीला चोप देत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आणले होते. यामध्ये सदरची व्यक्ती ही बोगस प्रकारे सर्वसामान्य नागरिकांनी कडून तसेच शहरातील सोने व्यापाऱ्यांकडून तसेच काही उद्योजकांकडून पैशांची लूटमार करून दमदाटी करत होती अशी माहिती समोर आली आहे.

तसेच अनेक नागरिकांची लूटमार देखील सदर व्यक्ती करत होती. त्यामुळे या व्यक्तीवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सदरचा व्यक्ती हा तृतीयपंथी नसून माणूस आहे. या व्यक्तीमुळे तृतीयपंथी समाज हा बदनाम होऊ नये म्हणून सदर व्यक्तीला चोप देत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते.

तर दुसरीकडे अशा प्रकारे कोणाची फसवणूक होत असेल तर तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष काजल गुरु यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *