DNA मराठी

Solapur Fire: मोठी बातमी! सोलापूरच्या एमआयडीसीत भीषण आग, 8 जणांचा मृत्यू

Solapur Fire: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, सोलापूर येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या टॉवेल कारखान्यात काल (रविवार, 18 मे) भीषण आग लागली. या आगीच्या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. बचाव कार्यात अग्निशमन दलाचे जवानही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्निशमन अधिकारी राकेश साळुंके म्हणाले की, टॉवेल कारखान्यातील भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना 17 तास लागले.