DNA मराठी

मुकुंदनगरमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, परिसरात तणावाचे वातावरण

Maharashtra News: मुकुंदनगर येथील मौलाना आझाद शाळेजवळ काल (दि. 13 मार्च) सायंकाळी एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात नाझीम नामक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर काही काळ मुकुंदनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *