Pankaj Asia : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी शासनाने नव्याने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया आज रुजू झाले. प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला.
डॉ.आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी डॉ. आशिया जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
डॉ.आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परिविक्षाधीन कालावधीत आर्णी येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार व बाभुळगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.