NZ vs SA: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 9 मार्च रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा फायनल सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड होणार आहे.
लाहोर येथे झालेल्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे लक्ष्य होते, परंतु आफ्रिकेची फलंदाजी अपयशी ठरली आणि त्यांना 50 षटकांत 9 विकेट्स गमावून फक्त 312 धावा करता आल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा ‘चोकर्स’ असल्याचे सिद्ध झाले. डेव्हिड मिलरने शतक (100) केले असले तरी ते संघाचा पराभव रोखू शकले नाही.
आता अंतिम फेरीत न्यूझीलंडचा सामना भारताशी होईल, जो रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारतीय संघाने पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
दक्षिण आफ्रिकेची फलंदाजीत सुरुवात खराब झाली. पाचव्या षटकात त्याने रायन रिकेलटन (17) कडून आपली विकेट गमावली. ही विकेट मायकेल ब्रेसवेलने मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर घेतली. यानंतर, कर्णधार टेम्बा बावुमा आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेन यांनी संघाची सूत्रे हाती घेतली. या दोघांमध्ये 105 धावांची भागीदारी झाली. बावुमाने 56 धावा केल्या पण मिशेल सँटनरने त्याला बाद केले. मात्र त्यानंतर इतर फलंदाजांना काही खास करता आले नाही.