Dhananjay Munde: सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड याला फाशी द्या, या मागणीसाठी मंगळवारी शिवसेनेने मुंबईत जोरदार आंदोलन केले. संतोष देशमुख यांच्या अमानुष मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद आज मुंबईत उमटले. शिवसेनेने वाल्मिक कराडला फाशी देण्याची मागणी केली.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे शिवसेना महिला आघाडीकडून वाल्मिक कराडविरोधात आंदोलन करण्यात आले. वाल्मिक कराडच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. वाल्मिक कराड ही प्रवृत्ती आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमधून या हत्याकांडाची भीषणता दिसून आली. अशा गोष्टी महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाण आहे.
वाल्मिक कराडला केवळ शिक्षा होऊन चालणार नाही. आरोपींना फाशी झालीच पाहिजे, ही शिवसेनेची प्रमुख मागणी आहे. यासाठी राज्यभरात शिवसेना रान उठवेल, असे शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या.