Uniform Civil Code : उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू होणार आहे. देशात समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड बनणार आहे. संपूर्ण उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू केले जाईल. हे राज्याबाहेर राहणाऱ्या रहिवाशांना देखील लागू होईल.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, यूसीसी धर्म, लिंग, जात किंवा समुदायाच्या आधारावर भेदभाव न करता सुसंवादी समाजाचा पाया रचेल. यामुळे सर्व लोकांना समान अधिकार मिळतील. कोणाविरुद्धही भेदभाव केला जाणार नाही. आम्ही आमचे वचन पूर्ण करत आहोत. भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली. जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे हे याचे एक उदाहरण आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत मजबूत उभा आहे.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री धामी यांनी पुष्टी केली होती की जानेवारी 2025 पासून उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू केला जाईल. यापूर्वी, नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले होते की सरकार यूसीसी लागू करण्यास वचनबद्ध आहे.
पुष्कर सिंह धामी म्हणाले गृहपाठ पूर्ण झाला आहे
धामी म्हणाले होते की राज्य सरकारने त्यांचे “गृहपाठ” पूर्ण केले आहे. जानेवारी 2025 पासून राज्यभरात यूसीसी लागू करण्याची तयारी करण्यात आली आहे.
ते म्हणाले होते, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन राज्यातील जनतेला दिले होते. सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही त्यावर प्राधान्याने काम केले. युसीसीचा मसुदा तयार होते. पण एक कायदा आणला गेला. आता आम्ही सोमवारी ती वचनबद्धता पूर्णपणे आणि औपचारिकपणे पूर्ण करणार आहोत.”
“हे पंतप्रधानांच्या एकसंध भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असेल जिथे कोणत्याही धर्म, लिंग, जात किंवा समुदायाविरुद्ध कोणताही भेदभाव केला जाणार नाही,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.