Dnamarathi.com

Vijay Wadettiwar : महामंडळाने मोठा निर्णय घेत एसटी भाडेवाढ केले आहे.त्यामुळे आता सरकारवर चारही बाजूने विरोधक जोरदार टीका करताना दिसत आहे. यात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

जर भाडेवाढ जर परिवहन मंत्र्यांनी केली नाही, उपमुख्यमंत्री अजितपवार यांचा विरोध आहे तर एसटीभाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याच बरोबर दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर या परिवहन खात्याला वाली कोण असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे. मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजे. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी? मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दरवाढ विरोध आहे तर दरवाढ मागे घ्यावी आणि दरवाढ मंत्र्यांनी केली नाही तर हे खाते चालवते कोण? अधिकारी जर खाते चालवतात, हा पोरखेळ आहे. सरकारमध्ये गंमत जंमत सुरू आहे. अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? अंगलट आला की अधिकाऱ्यांनी केलं आणि चांगल काही झालं की श्रेय घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे. असा टोला देखील यावेळी राज्य सरकारला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *