Walmik Karad : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड चर्चेत असून आता त्याच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुणे येथे करोडो रुपयांची संपत्ती आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती तर आता दुसऱ्या पत्नीच्या नावावर सोलापूरमध्येही संपत्ती असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांनी X वर पोस्ट करुन वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, वाल्मिक कराड ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव ज्योती मंगल जाधव असल्याचे काही माध्यमांनी दाखवले आहे. ह्या त्याच ज्योती मंगल जाधव आहेत क ? ह्याच्या नावाचे हे सोलापुरातले हे 4 सातबारे आहेत. ह्या ज्योति मंगल जाधव कोण आहेत? ह्याचा तपास ED ने करावा. कोणी ह्या जमिनीचे पैसे दिले ह्याचा देखील तपास झाला पाहिजे. अशी मागणी या पोस्टमध्ये त्यांनी केली आहे.
तर दुसरीकडे आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. आज वाल्मिक कराड जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काही दिवसापूर्वी पोलिसांनी मोठी कारवाई करत वाल्मिक कराडावर मकोका लावला आहे.