DNA मराठी

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांची कारवाई, चोरी होणाऱ्या मोटर सायकलाचा तपास लावला, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांनी मोठी कारवाई करत श्रीगोंदा न्यायालय आणि परीसरातुन चोरी होणाऱ्या मोटर सायकलाचा तपास करत तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करून दहा चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 4 जानेवारी रोजी श्रीगोंदा पो स्टे हद्दीतील काष्टी गावामध्ये एक इसम संशयीत रित्या विना नंबर प्लेटच्या मोटर सायकलवर फिरत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना माहिती मिळाली. या माहितीवरून किरण शिंदे यांनी पेट्रोलिंग करीता काष्टी गावात एक पथक रवाना केले.

पेट्रोलिंग दरम्यान श्रीगोंदा चौक, काष्टी येथे एक इसम श्रीगोंदा चौकात मोटार सायकल लावलेल्या ठिकाणी संशयीतरीत्या मोटार सायकलवर फिरत असताना मिळून आला. त्यास पोलिसांनी नाव-गांव विचारले असता महेंद्र बाळु सुपेकर (रा. पुनर्वसन काष्टी ता.श्रीगोंदा) येथे राहत असल्याचे सांगीतले तसेच अधिक चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आणले.

चौकशी दरम्यान पैशांची आवश्यकता असल्याने मी कोर्टाचे पाकींग, श्रीगोंदा शहर, काष्टी गावात व इतर वेगवेगळया ठिकाणाहुन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी आरोपींकडून 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *