Pushpa 2 : सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ आता देखील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. याच बरोबर आता या चित्रपटाने अनेक विक्रम देखील स्वतःच्या नावावर केले आहे.
माहितीनुसार, पुष्पा 2 ने पहिल्या आठवड्यात 725.8 कोटींची कमाई केली तर दुसर्या आठवड्यात 264.8 कोटी रुपये कमावले आणि तिसऱ्या आठवड्यात तब्बल
129.5 कोटी रुपये जमा केले. तर चौथ्या शुक्रवारी 8.75 रुपये कोटीचा व्यवसाय केला. यामुळे 1700 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा तिसरा भारतीय सिनेमा ठरला आहे.
तर दुसरीकडे नुकतंच रिलीज झालेले ‘वनवास’, ‘मुफासा’ आणि ‘बेबी जॉन’ या सिनेमांना देखील पुष्पा 2 ला टक्कर देता आली नाही.
पुष्पा 2 ने सगळ्यात अगोदर देशातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ला मागे टाकलं. 2017 मध्ये रिलीज झालेल्या प्रभासच्या या सिनेमाने 1030.42 कोटींचा गल्ला जमवला होता. पुष्पा 2 नं यापेक्षा जवळपास 120 कोटी रुपये जास्त कमावले आहेत. तसेच पुष्पानं किंग खानलाही मागे टाकलं आहे.